भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेचि जाणावे सज्जन

techi janave sajjan

रचनाकार: संत रामदास · अभंग
तेचि जाणावे सज्जन । जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी । फळाशेची नाही गोडी शांति क्षमा आणि दया । सर्व सख्य माने जया हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन बोलासारिखें चालणें । हींचि संतांचीं लक्षणें एकनिष्ठ उपासना । अतितत्पर भजना स्वार्थ सांडूनियां देणें । नित्य तेंचि संपादणें म्हणे रामीरामदास । जया नाहीं आशापाश।