भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलों नेणे

tayachi sundara shantichi bahuli | anik jibhali bolon nene

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलों नेणे ॥१॥ सेवेसी सादर होऊनियां राहे । भुकची ते खाये भुकेलिया ॥२॥ नित्य नैमित्तिक कांहीं न म्हणे । अंतरींची खूण जाणोनियां ॥३॥ नामा म्हणे न्य़ून पूर्ण सर्व हरि । आणिका विचारीं गुंतेचिना ॥४॥