भजनी मालिका
← भजनांकडे परत

तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे

tatvatan na kale | alen mana ten chavale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे ॥१॥ खरियासी मानी खोटें । खोटें खया ऐसें वाटे ॥२॥ अंध न देखे निवाडू । तम तैसा हाचि उजिवडू ॥३॥ निळा म्हणे बुध्दिमळीन । नेणें पाप कीं हें पुण्य ॥४॥