भजनी मालिका
← भजनांकडे परत

तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां

tatvata pai tattva dharitan naye hatan

तत्वता पै तत्त्व धरितां नये हातां । मग ममतेची चिंता तयासि पुसे ॥१॥ बाई कोणे घरीं सांगे वो जिवित्व । परेचें परतत्व कोणे घरीं ॥२॥ सखी सांगे गोष्ठी बाईये रुप वो धरीं । आपणचि घरीं सांपडेल ॥३॥ निवृत्तीनें खुणें सांगितलें ज्ञान । रखुमादेविवर ध्यान विठ्ठल वरदा ॥४॥