भजनी मालिका
← भजनांकडे परत

तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया

tapatrayaagnichi jalatase sagadi | ahaloni koradi jali kaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥ शोकमोहाचिया झळंबलों जाळीं । क्रोधाचे काजळीं पोळतसें ॥३॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥ धांवधांव करुनाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥५॥