भजनी मालिका
← भजनांकडे परत

तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें

tap na karisi jap hlashikeshi | nam aharnishin raghobachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें ॥१॥ तीर्थाचें हें तीर्थ नाम हें समर्थ । होइल कृतार्थ रामनामीं ॥२॥ साधेल साधन तुटेल बंधन । वाचे नारायण सुफल सदा ॥३॥ नामा म्हणे हरिनाम तें उच्चारी । तरीच उद्धारी इह लोकीं ॥४॥