भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव विनवी ज्ञानदेव । सकळांचा जाणोनी ठाव

tanv vinavi dnyanadev | sakalancha janoni thav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव विनवी ज्ञानदेव । सकळांचा जाणोनी ठाव । शुद्ध भक्ति प्रेमळ वैष्णव । सर्वभाव सख्य घेतां ॥१॥ बैसोनियां एक आसनीं । देशभक्त चक्रपाणि । तांबुल घेवोनियां वदनीं । सुखसंतोषें बोलती ॥२॥ मग पाचारिला गरुड । भक्त पूंडलिक प्रौढ । भक्त सोपान गम्यगूढ । जाणते भक्त ॥३॥ केलें प्रयाणासि मुहूर्त । पंढरीस जावयाचें आर्त । संवत्सरा जाऊनि त्वरित । समाधी देऊं सोपाना ॥४॥ ऐसा निर्धार करुनि । समस्तां भोजने सारुनि । सिद्ध जाली माता रुक्मिणी । दिन अस्तमाना गेला ॥५॥ जावोनी तया पुष्पकावरी । शयन आरंबिलें हरी । नारद तुंबर वैकुंठाभीतरीं । मंजुळ सुस्वरीं गातसे ॥६॥ भक्त भागवत भाग्याचे । तीहीं जयजयकार केला वाचे । ऐसें चतुर पाहार निशींचे । जागरण हरीचें कर्मिलें ॥७॥ नामा म्हणे निघतां हरी । ज्ञानदेवो प्रार्थना करी । देवा तूंचि वैकुंठहरी । आमचा ह्रदयस्थु ॥८॥