भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव त्यां म्हणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका । असेल चपळ गडी जो नेटका । तेणें चढावें वृक्षावरी

tanv tyan mhane re gadiho aika | utaruni hachi anun nika | asel chapal gadi jo netaka | tenen chadhaven vrukshavari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव त्यां म्हणे रे गडिहो ऐका । उतरुनी हाचि आणूं निका । असेल चपळ गडी जो नेटका । तेणें चढावें वृक्षावरी ॥१॥ तंव ते म्हणती नहो बाहेरी । आम्ही बळकट चढावाया वरी । वृक्षही उंच गगनोदरीं । डोहो भ्यासुर अक्षोभ हा ॥२॥ म्हणे गडीहो तरी तळींचि रहा । आणितों जाऊनि चेंडु पहा । ते म्हणती रे अचपळा रहा । निमित्य आम्हावरी आणूं नको ॥३॥ एका दोन कामीं वांचलासी । तैसेचि येथेंही पाहतोसी । परी हे बुध्दि नव्हे ऐसी वेळा सारखिया नसताती ॥४॥ पाय निसरोनियां जाईल । अथवा खांची उपटी उपटे । हांसे इतरांचे होईल । आपणही जिवें घातावें ॥५॥ ऐसें न करिती शहाणे । विचारुनी पहाती सर्वगुणें । मग हितावह तोचि घरणें । दृढ निश्रचयें मानसीं ॥६॥ निळा म्हणे सांगतां ऐसें । न मानिजे कृष्ण मानसें । मनींचें कार्य जें अनारिसें । तें नेदीचि कळों कोणासी ॥७॥