भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढां दशनें । श्रीकृष्ण्‍ा कंठीचे रुधिरपान । करावया उदितें

tanv tya rithiyasi nighalin vadanen | ati vikral dadhan dashanen | shrikrushn‍a kanthiche rudhirapan | karavaya uditen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव त्या रिठीयासी निघालीं वदनें । अति विक्राळ दाढां दशनें । श्रीकृष्ण्‍ा कंठीचे रुधिरपान । करावया उदितें ॥१॥ कृत्रिमें जाणेनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोहीं करी । आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥ त्याचें स्विष्टकृत केलियावरी । आक्रोशें पाळणियांत रुदन करी । तें ऐकानि यशोदा सुंदरी । धंवली झाडकरी काय झालें ॥३॥ तंव देखे शोणिताचे पूर । मांस मदाचे संभार । मग म्हणे गे मरमर । बाळ मासर्पे खादलें ॥४॥ धांविल्या नरनारी बाळ । घात केला म्हणती सकळ । ऐसी कैशी गे तू वेल्हाळ । यशोदे मारविलें बाळका ॥५॥ वाहाती शोणिताचे पुर । इतुकें कैंचे गे त्या रुधिर । काढूनियां पहा गे सत्वर । आहे प्राण कीं गेलास ॥६॥ निळा म्हणे जाउनी जवळी । काढूनि आणिला जों वनमाळी । तंव हास्यवदन नित्य काळीं नाही कोमाइला ना दचकला ॥७॥