भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते सकळ आले शीघ्रवत । आनंदें गर्जत नामघोषें

tanv te sakal ale shighravat | ananden garjat namaghoshen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव ते सकळ आले शीघ्रवत । आनंदें गर्जत नामघोषें ॥१॥ प्रेमें उचंबळत अंतरीं बोधले । सप्रेंमे लोटले चरणांवरी ॥२॥ त्या सुखाचा आनंदु न वर्णवे वाचे । एवढें भाग्य कैचें बोलावया ॥३॥ आलिंगोनि देवें धरिलें ह्रदयकमळीं । सादर सांभाळी कृपादृष्टी ॥४॥ श्रीमुखाची वास पाहती वेळोवेळां । जाला एकवळा आनंदाचा ॥५॥ मग उदार चक्रवर्ति सर्वज्ञाचा रावो । सांगे जीवींचा भावो रुक्माईसी ॥६॥ केला चंद्रभागें संकल्प संपूर्ण । तो व्हावा उत्तीर्ण सर्वभावें ॥७॥ क्षेत्रवासी द्विज सुशील सदाचार । जे पुण्यसागर भूदैवत ॥८॥ ज्यांचेनि दर्शनें पाप ताप जाय । यशकीर्ति होय चरणर्तीर्थें ॥९॥ तरी ते प्रार्थुनियां आजी आणावे त्रिभुवना । द्यावें त्या भोजना भक्तिभावें ॥१०॥ तेणें सकळ काम होतील परिपूर्ण । घ्यावें आशीर्वचन ब्राह्मणांचें ॥११॥ तंव म्हणे रुक्माई ब्रह्मांडनायका । अक्षत सकळिकां द्यावी देवा ॥१२॥ सकळहि सिद्धि असती सदोदित । कर जोडुनि तिष्ठत सकळ काम ॥१३॥ हांसोनि पंढरीनाथ बोले कवतुकें । जिवलगा आईके विष्णुदास ॥१४॥ पुढती कवतुक करणें तुजलागीं । नामयासी वेगीं कळली खूण ॥१५॥