भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनियां वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया स्वरूपाचा

tanv pudalik pudharala | kar jodiniyan vadala | mhane vedadikan abola | tujhiya svarupacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनियां वदला । म्हणे वेदादिकां अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥ तो तूं प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजनां तारीसी ॥२॥ नेणों कोण भक्तपण । नेणों तुमचें महीमान । कोणे जन्मीं साधन । कोण केलें हें नेणवे ॥३॥ नीरे भीवरे संगमीं । चंद्रभागेचे उगमीं । वेणुनाद परब्रह्मीं । गोपाळ गजरें गर्जती ॥४॥ तरी स्वामी दीनदयाळा । महाविष्णु गा गोपाळा । भक्तालागीं कृपाळा । तारावया तयासी ॥५॥ माझें करोनिया मीस । वास केला युगे अठ्ठावीस । करूनियां रहीवास । माझे भक्ति लाधलासी ॥६॥ तूं नीयंता ईश्वरमूर्ती । सकळा गोसांवी श्रीपती । तुजवांचूनि नेणें मती । दयामूर्ति परब्रह्म ॥७॥ नामा म्हणे पुंडलिकें । ऐसें स्तवन केलें निकें । तंव म्हणितलें पुण्य श्लोकें । पुरे पुरे करीं आतां ॥८॥