भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारीम । तिहीं सर्व सामोग्री सिद्ध केली

tanv animadi siddhi ubhya mahadvarim | tihin sarva samogri siddha keli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारीम । तिहीं सर्व सामोग्री सिद्ध केली ॥१॥ सडासंमार्जनें गुढिया तोरणें । शृंगारिलीं भुवनें परिचारिकीं ॥२॥ म्हणती काय पुण्य केलें येणे विष्णुदासें । देवा लोभ पिसें लावियेलें ॥३॥ द्वारीं दिपावळी चौकरंग माळा । अभिनव सोहळा आरंभिला ॥४॥ हरुषें मंगळ तुरे वाजती विनोदें । भक्त जयजय शब्देम गर्जताती ॥५॥ मंगळ मार्जन नामयातें करविलें । मग तें आरंभिलें पुण्याहवाचन ॥६॥ देवे अंगवस्त्रें आपुलेनी हातें । वाहिलीं अनंतें विष्णुदासा ॥७॥ सत्यभामा राही रुक्माई जननी । वेगीं अक्षवाणी घेऊनि येती ॥८॥ आनंदें नरनारी कवतुक पाहती । जीवें ओवाळिती नामयासी ॥९॥ आपुलिया दासाचा करी समारंभु । दीनानाथ प्रभु कृपसिंधु ॥१०॥ धन्य हा नामा म्हणती सकळ लोक । नेणती याचें सुख ब्रह्मदिक ॥११॥