भजनी मालिका
← भजनांकडे परत

तनु हें आकाश चंद्रमा तें मुख । असे निष्कलंक परी-क्षिती

tanu hen akash chandrama ten mukh | ase nishkalank pari-kshiti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तनु हें आकाश चंद्रमा तें मुख । असे निष्कलंक परी-क्षिती ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र त्याहूनि अधीक । शोभत श्रीमुख कृष्ण-जीचें ॥२॥ भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळ । खेळत सांवळा जगद्नुरु ॥३॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । अक्रूरें देखिले दोघेजण ॥४॥ जोडोनियां हात घाली नमस्कार । वाहतसे नीर क्षणोक्षणीं ॥५॥ नामा ह्मणे त्वरें धांवे ह्लषिकेशी । धरीत पोटाशीं अक्रूरातें ॥६॥