भजनी मालिका
← भजनांकडे परत

तांतडीनें जाती । कंसा सेवक सांगती

tantadinen jati | kansa sevak sangati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तांतडीनें जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥ उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥२॥ त्वरें धांव घाली । पाहे कन्या उप­-जली ॥३॥ ज्याचा धोका तूज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥ मारायाशीं खड्‍ग घाली । हातिंची सुटूनियां गेली ॥५॥ तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥ सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समा-धान ॥७॥ नामा ह्मणे तयेवेळीं ॥ त्यांचीं बंधनें काढिलीं ॥८॥