भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये

svaskandhi baisanen apuliye chhaye

रचनाकार: संत रामदास · अभंग
स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये। अघटित काय घडो शके दुजेविण सुखें स्वरुप बोलणे । अद्वैतासी उणे येऊं पाहे सुख आणि दु:ख वृत्तीच्या संबंधें। निवृत्तीच्या बोधें द्वंद्व कैचे सुखातीत देव पहावा अनंत। दास म्हणे संत वृत्तिशून्य वृत्तिशून्य संत असोनिया वृत्ति। हेखूण जाणती अनुभवी