भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां

svarupi pahatan lakshalihi ghetan

स्वरुपी पाहातां लक्षलिही घेतां । अरुप अनंता गुणी नाहीं ॥१॥ कैसेनि स्वरुप प्रकाश पैं दीप । एकीं एका सोप आकळे कैसें ॥२॥ नाहीं या आधार आधारासि निर्धार । परेसि परे पार परमतत्त्व ॥३॥ ज्ञानदेवघरीं पश्यंती वोवरी । वेदश्रुती घरीं दीप केले ॥४॥