भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वरुप पाहे तंव सभोंवतें रुपडें

svarup pahe tanv sabhonvaten rupaden

स्वरुप पाहे तंव सभोंवतें रुपडें । पाहे चहूंकडे तोचि दिसे ॥१॥ काय करूं सये कैसा हा देव । माझा मज भाव एकतत्त्वीं ॥२॥ सम तेज पाहे तंव एकचि वो तेज । ओंकार सहज निमाला तेथें ॥३॥ मूळीचि मुळ खुण न संपडे सर्वथा । व्यापिलें चित्ता तेजें येणें ॥४॥ स्वानुभव ते दिवटी उजळूनि जव पाहे । तव एक बिंब दाहे दिशा दिसे ॥५॥ ज्ञानदेव निवृत्ति हे खूण पुसत । सांगावें त्वरित गुरुराजें ॥६॥