भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचिनि सुखें मानितासि सुख

svapninchini sukhen manitasi sukh

स्वप्नींचिनि सुखें मानितासि सुख घेतलिया विख जाईल देह ॥१॥ मोलाचें आयुष्य दवडितोसि वायां । माध्यान्हींची छाया जाय वेगीं ॥२॥ वेग करी भजनां काळ यम श्रेष्ठ । कैसेंन वैकुंठ पावसील झणें ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठल उभा । सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे ॥४॥