भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचेनी धनें भरोनियां लाहे

svapnincheni dhanen bharoniyan lahe

स्वप्नींचेनी धनें भरोनियां लाहे । भला वेव्हार करुं पाहासी । मुद्दलाची नाहीं तेथें कळांतर कैचें धरणें अधरणें घेतासी । लटिकिया साठीं संसार दवडोनी । ठकूनी ठकलासी रया ॥१॥ कवण नागवितो कां न गवसी । वेडावलेपणें ठकसील तूंची । चोरोनी तुझें त्त्वांची नेलें । आतां गार्‍हाणें कवणा देसी रया ॥२॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । हे सहज परम गुण अंशांशा आले । येणेंची कष्टें व्यवहार करितां कोठें काय सांठविले । विचारुनि पाहें तुझें त्वांचि नेलें आतां तुजमाजी हारपले रया ॥३॥ पुत्र कळत्र संपत्ती देखोनी संतोष मानिसी । घडि येकामाजी नासोनी जाईल जैसे कां अभ्र आकाशीं । बापरखुमादेविवरु विठ्ठलुची ह्रदयीं असतां का नाडलासी रया ॥४॥