भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचेनि भ्रमें धरिसी स्थुलाकृति

svapnincheni bhramen dharisi sthulakruti

स्वप्नींचेनि भ्रमें धरिसी स्थुलाकृति । परि सिध्द नव्हे सत्य त्याच्या पायीं ॥ कारण महाकारण लिंग आणि चतुष्टय । हे शाब्दिक उपाय बोलों ठाती ॥१॥ येक नाहीं तेथें दुजें कायिसें । देहद्वय पाहातां दुजें न दिसें ॥२॥ तेचि ते संकल्प स्थूळ नैश्वर्याचें भान । त्या म्हणती कारण नवल पाहीं ॥ महाकारण लिंगदेह शाब्दिकीं धरिला । तो शास्त्रज्ञीं पाहिलां अर्थी साही ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि देहीं । अवस्थातीत पाही तोचि एक ॥ निवृत्तिरायें अंजन लेऊनि । पायाळ निजसदन तें विश्व जालें ॥४॥