भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नींचा घाई विवळें साचें

svapnincha ghai vivalen sachen

स्वप्नींचा घाई विवळें साचें । चेईलिया वरी म्हणे मी न वाचें ॥१॥ जन कैसें माया भुलले । आपलें हित चुकले ॥२॥ आपींआप देखिलें । परतोन पाहे तों येकलें ॥३॥ आपींआप असे । मी काय जालोंसे लोकां पुसे ॥४॥ सकळहि शास्त्र पढिनले । नुगवेचि प्रपंची गुंतले बापरखुमादेवीवरा विठठलें । कैसें गुरुमुखें खूणा उगविलें ॥५॥