भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामीचे कृपेनें चिदघन ओळलें

svamiche krupenen chidaghan olalen

स्वामीचे कृपेनें चिदघन ओळलें । रसा तळ पाल्हेलें ब्रह्मतेजें ॥१॥ कृपाळु श्रीगुरु ओळला सर्वत्र । आपेआप चरित्र दृष्टी दावी ॥२॥ ॐ काराचें बीज समूळ मातृकीं । दिसे लोकांलोकीं एकतत्त्वीं ॥३॥ विकारीं साकार अरुपीं रुपस । दावी आपला भास आपणासहित ॥४॥ सर्वांग सम तेज ऐसा हा चोखडा । पाहतां चहूंकडा दिव्य तेज ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तिशीं पुशिलें । सत्रावी दोहिल पूर्ण अंशीं ॥६॥