भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे

svahit sangaven bhalen| jaisen apanasi kale

रचनाकार: संत सेना · अभंग
स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे ॥१॥ त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥२॥ मोहपाशें बांधिला । होता तोहि मुक्त केला ॥३॥ जेणें वाट दाखविली। सेना म्हणे कृपा केली ॥४॥