भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वभावें गाईन। आवडीनें तुझें नाम

svabhaven gain| avadinen tujhen nam

रचनाकार: संत सेना · अभंग
स्वभावें गाईन। आवडीनें तुझें नाम ॥१॥ हाचि माझा निर्धार । न करी आणिक विचार ॥ २॥ लोळेन तुझिये आंगणीं । निर्लज्ज होउनि मनीं ॥३॥ रंगीं नाचेन मना ऐसें। पाहिन श्रीमुख सरिसें ॥४॥ सेना म्हणे संकल्प जीवा । हाचि निर्धार हेवा ॥५॥