भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी

suvarnacha shobhe mastakin mugut | hirre ghanadat tayavari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥ विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥ कमळाकार नेत्र आकर्ण शोभती । कुंडलें झळकती कर्णीं ज्याच्या ॥३॥ सरळ नासिक लावण्य मुखचंद्र । हनुवटी सुंदर राघवाची ॥४॥ कंठाचा आकार कंबुग्रीवा ऐसा । ह्लदयावरी ठसा द्वजिपद ॥५॥ सुकुमार सुरेख जयाचें उदर । ब्रह्मांडें अपार वसती जेथें ॥६॥ नाभीकमळींचा ब्रह्मा नेणे अंत । कडदोरा शोभत कटीं ज्याच्या ॥७॥ दंडीं पेटया करीं जडित मुद्रिका । पिंवळा नेटका पीतांबर ॥८॥ केशराची उटी सरळ बाहूदंड । चिमणा कोदंड हातीं ज्याच्या ॥९॥ गर्जती नेपुरें कोमळ चरणीं । वज्रांकुश चिन्हीं विराजीत ॥१०॥ कौस्तुभ मुक्तमाळा रुळे वैजयंती । भ्रमर भुलती नामा म्हणे ॥११॥