भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी

surya vitala prakashasi | pari to sanditan nayechi tyasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥ तेवीं हा पंढरीश परमात्मा । सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥ अग्नि दीपना विटला । परि ते न सुटेचि कीं त्याला ॥३॥ निळा म्हणे साखरे गोडी । उदका आर्द्रता न सोडी ॥४॥