भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्य न देखे अंधकारा । अग्नि जेवीं शीतज्वरा

surya na dekhe andhakara | agni jevin shitajvara

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सूर्य न देखे अंधकारा । अग्नि जेवीं शीतज्वरा ॥१॥ तेंचि हरिभक्तां सांकडे । येऊंचि न शके तयापुढें ॥२॥ हनुमंतासी भूतबाधा । नव्हे कल्पांतीही कदा ॥३॥ निळा म्हणे दत्तात्रया । न बाधी मोह ममता माया ॥४॥