भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी

kay tujhi thori varnun mi pamar | hosi dayakar krupanidhi

रचनाकार: संत नरहरी · अभंग
काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥ तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ ॥ जन हो जोडी करा नाम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३ नरदेही साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥ गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥