भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर उटी मलयागरे

sundar uti malayagare

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुंदर उटी मलयागरे । वेढिलीं चिरें पापेंचि ॥१॥ मोरपिसें मुगुटावरी । मुरली अधरी वाजवितु ॥२॥ घनश्याम हा मदनमूर्ती । झळके दीप्ती पदकाची ॥३॥ निळा म्हणे पांडूरंग । संतसंग भोंवताला ॥४॥