भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती

sulabh soparen nam keshavachen | athavitam vache dosh jati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥ अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥ जातिवंत आम्ही वेदाचे पाठक । तरी सर्व फिकें नामाविण ॥३॥ नामा म्हणे नामीं रंगलों सतत । म्हणोनि अनंतें दिधली भेटी ॥४॥