भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी

sukshma sadhya kaj sangitale svami

सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी । धृति धारणा क्षमीं हारपल्या ॥१॥ सूक्ष्म सख्य नेलें विश्वरुप देहीं आलें । प्रपंचेसि मावळलें तिमिर रया ॥२॥ विशेषेंसि मिठी दिधलि शरिरें । इंद्रियें बाहिरें नाईकती ॥३॥ ऐसें हें साधन साधकां कळलें । चेतवितां बुझालें मन माजें ॥४॥ उतावेळ पिंड ब्रह्मांडा सहित । नेत्रीं विकाशत ब्रह्मतेज ॥५॥ ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज । हरपली लाज संदेहेसीं ॥६॥