भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं

sukhen janmataren gheun | namen alavun shriharichin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥ नाहीं आम्हा त्याचें कोडें । संसार बापुडें तें काये ॥२॥ कळिकाळाचें भय तें किती । पाया पडति यमधर्म ॥३॥ निळा म्हणे सर्वहि सिध्दी । रुळती पदीं हरिनामें ॥४॥