भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ

sukhalagin jari karisi talamal | tari tun pandharisi jay ek vel

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ ॥१॥ तेथें अवघाची सुखरूप होसी । जन्मोंजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥ चंद्रभागेसी करितां स्नान । तुझे दोष पळती रानोरान ॥३॥ लोटांगण घालेनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥ नामा ह्मणे उपमा काय द्यावी । माझ्या विठ-बाची इडा पीडा घ्यावी ॥५॥