भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखालागें मन तुझें गिवसित तळमळी । परि सुख आहे जवळी नकळे तुज

sukhalagen man tujhen givasit talamali | pari sukh ahe javali nakale tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखालागें मन तुझें गिवसित तळमळी । परि सुख आहे जवळी नकळे तुज ॥१॥ दर्पणीं दीप्ति कीं दुग्धीं घृतशक्ति । परि करणीविण हातीं न लभेची जाण ॥२॥ सुखालागीं सुखसोय दाखवीत पाहे । अनुभवोनी होय सुखरूप ॥३॥ सुख तें शांति सुख तें दया क्षमी । सुख तें उपदेश मी निर्विकारी ॥४॥ सुख तें नैराश्य सुख हरिदास्य । सुख तें विश्वास सदा वसे ॥५॥ सुख तें सत्संगतीं सुख तें नामीं प्रीति । सुख तें विकृति विषयभोगीं ॥६॥ सुख तें एकांतवास सुख तें लौकिक त्रास । सुख तें सौरस स्वस्वरूपीं ॥७॥ म्हणे खेचर विसा परियेसी विष्णुदासा । न घडे भरंवसा तरी अनुभवणें ॥८॥