भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे

sukh du:kha jivachen sangen apulen | hladay phugalen phuton pahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥ धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥ संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥ अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥ नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥