भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुख दुःख दोन्ही आम्हासीं सारिखीं । प्रतीति पारखी मना आली

sukh duhkh donhi amhasin sarikhin | pratiti parakhi mana ali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुख दुःख दोन्ही आम्हासीं सारिखीं । प्रतीति पारखी मना आली ॥१॥ अंतर्बाह्म एक ब्रह्मचि कोंदलें । दुजेपण नेलें निपटोनि ॥२॥ त्वचा टाकुनियां सर्प गेला बिळीं । मग तो सांभाळी कोण सांगा ॥३॥ ओघ सोडूनियां गंगा सिंधू ठाये । विस्तराळीं धाये खळाळाची ॥४॥ नामा म्हणे रात्र जैसी कां पाहाळे । धरणीतें जालें तैसें आम्हां ॥५॥