भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदामा म्हणे अनंता । आम्हा आज्ञा द्यावी आतां

sudama mhane ananta | amha adnya dyavi atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुदामा म्हणे अनंता । आम्हा आज्ञा द्यावी आतां ॥१॥ जाऊं घरासीं सत्वर । येऊनि दीवस झाले चार ॥२॥ सर्व ठेउनी जातां बरें । वाटे मारिती तस्कर ॥३॥ ऐसी ऐकोणी वचनें । सर्व काढिलीं भूषणें ॥४॥ आज्ञा घेउनी चालिला । देव बोळवीत आला ॥५॥ नामा म्हणे चोर । याचा उफराटा व्यापार ॥६॥