भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं

soyara shrihari | atma ek characharin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥१॥ नाहीं तया आपपर । वसवी सकळांचे अंतर ॥२॥ देवां दानवां मानवां । स्थूळ सूक्ष्मादिकां सर्वां ॥३॥ निळा म्हणे जीवमात्रीं । व्यापकपणें तोचि धात्री ॥४॥