भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या

sopan vatheshvar ubhe thele pudhati | pancharatya hoti anandachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या ॥१॥ गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज । देव निवृत्तिराज पूजियेले ॥२॥ धूप आणि दीप आणिलें संपूर्ण । पूजिलें गगन सोपानानें ॥३॥ दाही दिशा द्दष्टि अवलोकिली सारी । गगन अंकुरीं डवरिलें ॥४॥ चक्र सर्पाकार विजा लखलखती । ज्योति प्रकाशति रानोमाळ ॥५॥ नामा म्हणे देवा उदय जाला सकळ । सोपानदेवें मूळ दाखविलें ॥६॥