भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोळा त्या समाधि औट पीठा माझारी । तेथें नर- हरि देव नांदे

sola tya samadhi aut pitha majhari | tethen nar- hari dev nande

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोळा त्या समाधि औट पीठा माझारी । तेथें नर- हरि देव नांदे ॥१॥ बारा गुंफे माजीं भ्रमर गुंफे मध्यें । तेथें आत्मा शुद्ध ज्ञान नांदे ॥२॥ गोल्हाटाचा भेद असेची आघवा । शुद्ध ज्ञानदिवा अलक्षतो ॥३॥ नामा म्हणे आम्हां तेजाच्या उजेडा । देव केला घोडा बैसावया ॥४॥