भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां

sola sahasra taten dvijalagin alin | amrutachi geli chavi tevhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां ॥१॥ पक्कान्नाचा तरी वाढवूं विस्तार । होईल उशीर कथेलागीं ॥२॥ हरिरुचि जेवण सुदामा जेविला । वेगीं आंचवला संसारासी ॥३॥ नामा म्हणे त्यासी देवें दिल्या विडा । रंगला तो जोडा वैराग्याचा ॥४॥