भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें

sohan hansa mhanije to mi mi to aise | he vakya vishvase vivaraven

रचनाकार: संत रामदास · अभंग
सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ।। विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ।। तूंचि एक ब्रह्म हेचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ।। अर्थबोध रामीरामदासीं जाला । निर्गुण जोडला निवेदनें ।।