भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडोनियां जाती पोतीं । कृपा करुनी दिधलीं हातीं

sodoniyan jati potin | krupa karuni didhalin hatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सोडोनियां जाती पोतीं । कृपा करुनी दिधलीं हातीं ॥१॥ संत उदार उदार । लुटविलें निज भांडार ॥२॥ होतें सायासें जोडिलें । निक्षेपीचें तें दाविलें ॥३॥ निळा महणे उदारपणा । मेरु संतांच्या ठेंगणा ॥४॥