भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें

sodin kanha ravi dor mathitya deten | baya maj ten de ai maj ten de deran ghumaghumaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें ॥१॥ यशोदा उचलोनी कडे त्यासी घेउनी । दाविती चित्रशाळेतें ॥२॥ करीं कर धरुनी नेउनी अंगणीं । दावी कुप बावीतें ॥३॥ दावीत आरशांत । म्हणे पाहे कृष्णनाथ । मुखमुखा चुंबितें ॥४॥ चिमण्या ह्या गौळनी । आल्य अत्याहो मिळोनी । राधे उरीं मज तें दे ॥५॥ राधेसी म्हणे नामा । कृष्णासी तुझा प्रेमा । समजावियासी तें दे ॥६॥