भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नान संध्या टिळेमाळा

snan sandhya tilemala

रचनाकार: संत रामदास · अभंग
स्नान संध्या टिळेमाळा । पोटीं क्रोधाचा उमाळा एसें कैंसें रे सोंवळे। शिवतां होतसे ओंवळें नित्य दंडितां हा देहो । परि फिटेना संदेहो बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ नित्यनेम खटाटोप । मनीं विषयाचा जप रामदासीं द़ुढभाव । तेणेंविण सर्व वाव।