भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली

shrimurti ase bimbali tari he dehasthiti palatali

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
श्रीमूर्ती असे बिंबली तरी हे देहस्थिती पालटली ॥१॥ धन्य माझा इह जन्म हृदयीं विठोबाचें नाम ||२॥ तृष्णा आणि आशा पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥ नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं विठ्ठल उभा आहे ।।४।।