भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवण त्त्वचा चक्षु जिव्हा घ्राण

shravan ttvacha chakshu jivha ghran

श्रवण त्त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । दशहि इंद्रिये जाण हरीच्या ठायीं ॥१॥ अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंदु । अवघा हा विद्वदु भरला दिसे ॥२॥ पतीतपावन नामे दिनोध्दारण । स्मरलिया आपण वैकुंठ देतु ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हें पुंडलिक जाणे । अंतकाळी पेणें साधीयेलें ॥४॥