भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रवण घ्राण रसना त्त्वचा आणि लोचन

shravan ghran rasana ttvacha ani lochan

श्रवण घ्राण रसना त्त्वचा आणि लोचन हें तों दैन्याची द्वारें वोळगसी । यांचें यांसीचि न पुरे तुज पुरविती काये । यालागीं धरिजेसु आपुली सोयरे बापा ॥१॥ अरे मनारे अरे मनारे । न संडीं न संडीं हरिचरण कमळारे ॥२॥ स्वप्नींचें धन तें धनचि नव्हे । मृगजळींचें जळ तें जळचि नव्हे । अभ्रींची छाया ते साउली नव्हे । ऐसें जाणोनिया वेगीं धरिजेसु आपुली सोयरे रया ॥३॥ तूं जयाचा तेथोनि जिवें जितासी । त्या श्रीहरीतें रे नोळखसी । बापरखुमादेविवरा विठ्ठला चिंतीसी । तेणें पावसी तूं सुखाचिया राशी रया ॥४॥