भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं

shetaya jhala hari | dravya goni loti dvarin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥ बुद्धि सांगे राजाईसी । तुम्ही न छळावें नाम्यासी ॥२॥ अवघ्या वित्तासी वेंचावें । सरल्या मजपासीं मागावें ॥३॥ विठ्ठलशेट नाम माझें । नामयाला सांगावें ॥४॥ आतां उचित दासी । ऐसें बोले राजाईसी ॥५॥ ऐसे बोलोनियां गेला । म्हणे जनी नामा आला ॥६॥