भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेष पुसतां बाणातें। कोणे काजा आला तेथें

shesh pusatan banaten| kone kaja ala tethen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शेष पुसतां बाणातें। कोणे काजा आला तेथें।।१।। वाण करी अहाकार मुखें पडलीया धूर ||२|| वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसें येथें झालें देखा ||३|| काय शिखंडीचे बाण करिती भीष्माचें पतन ||४|| तेथें मागितलें पाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥